पुणे : सांस्कृतिक आणि विद्येचं महेरघर असे शहर म्हणून ओळखले जाणारे पुण्यामध्ये अघोरी पूजा घालण्याचा प्रकार घडला. पत्नीवर भानामती नष्ट व्हावी म्हणून अघोरी पूजा घालून पत्नीला सर्वांससमोर अंघोळ करायला लावली. हा सगळा प्रकार पुण्यातल्या कात्रज आंबेगाव येथे घडला आहे. या बाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पती शिवराज कोरटकर (वय ३६ रा. सदनिका क्री ९०३ कात्रज आंबेगाव, सासरे राजेंद्र कोरटकर वय ६४ सासू चित्रालेखा ६२ , मांत्रिक मौलाना बाबा जामदार )यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पती ,सासरे, सासूला पोलिसानी अटक केली असून मांत्रिक अजूनही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

घटस्फोटीत महिलेवर व्यावसायिक झाला फिदा, लग्न केलं युरोपला नेलं पण परत येताच पायाखालची जमीन सरकली
घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व पत्नी वरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्र प्राशन होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेणून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली व एक ते दोन कोटी रुपये फिर्यादीकडून घेतले. हा सगळा प्रकार पुण्याच्या आंबेगाव परिसर घडला आहे. फिर्यादी पत्नी हिला आरोपी पती यांनी संगनमत करून पत्नीचे शारीरिक व मानसिक शोषण करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केली.

हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा खळबळजनक दावा, सांगितले घातपाताचे धागेदोरे
इतकंच नाहीतर फिर्यादीचे आई वडिलांनी लग्नामध्ये दिलेले सोन्याचे हिन्याचे व चांदिचे दागिने पत्नीने पतिकडे विश्वासाने ठेवण्यास दिलेले असताना आरोपी पती यांनी ते परस्पर अपहार करून फिर्यादी यांचे फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवून त्यावर बनावट स्वाक्षरी करून बँकेकडून ७५ लाख रुपये कर्ज घेवुन आरोपी पतीच्या व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी घरामध्ये सुखशांती नांदावी व पत्नी यांचेवरची भानामती नाहीशी व्हावी.

याकरीता पती व सासरे मदतीने अघोरी पुजा करून पुत्र प्राप्तीसाठी मांत्रिकाचे सांगण्यावरून रायगड येथे नेवून पत्नीला सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावून फिर्यादीला वेळोवेळी मारहाण करून त्यांच्याकडून व्यवसायाकरीता पतीने ते सासरेला कोटी रुपेय घेवून ते परत न करता पत्नीला यांची फसवणुक केल्याने गुन्हा दाखल आहे.

Har Ghar Tiranga: ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा नियम मोडला, अनेकांनी घरावरचा तिरंगा उतरवलाच नाही; आता?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here