मुंबई : अभिनेता पंकज त्रिपाठी असा अभिनेता आहे, ज्याला गावच्या मातीची नेहमीच ओढ असते. खरं तर तो खूप बिझी आहे. तरीही त्यातून वेळ काढून पंकज आपल्या गावाला नेहमीच जात असतो. आताही तो गावातच आहे. पण तो फक्त तिथे जाऊन भटकत नाही किंवा आराम करत नाही. तो आपलं गाव गोपालगंजला खास कारणासाठी पोहोचला आहे.

पर्यावरणासाठी सजगता अभियान
पंकज त्रिपाठी नेहमीच गावाला जात असतो. कधी पावसाची मजा घेण्यासाठी, तर कधी मातीचा गंध अनुभवण्यासाठी. यावेळी मात्र पंकज त्रिपाठी एक अभियान घेऊन गावाला आलाय. त्यानं या चांगल्या कामाची सुरुवात गावापासूनच केली आहे.

आई कुठे काय करते : अनिशच्या येण्यानं अनिरुद्ध भडकला, मालिकेत रंगणार नवी लव्हस्टोरी!

जुन्या योजनेला दिला आकार
पंकज त्रिपाठी गोपालगंजजवळ बेलसंड गावात आला आहे. या पर्यावरण अभियानाबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘ ही खूप जुनी योजना आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहे. आपण जिथे उभे आहोत, तिथून एक किलोमीटर कुठलंच झाड नाही. हिरवळ नाही. म्हणूनच इथे झाडं लावणं गरजेचं आहे.’

पंकज त्रिपाठी वृक्षारोपण करताना

पंकज पुढे म्हणाला, गावातल्या लोकांचा या वृक्षारोपणासाठी सहभाग आहेच. जिल्हा प्रसासनही मदत करत आहे. ५०० झाडं लावण्याचं आम्ही ठरवलं आहे. लोकांमध्ये वृक्षारोपणाची जागृती वाढत आहे.

फिल्मफेअरचा कंगना रणौतला मोठा झटका; मॅगझिनवर केलेले आरोप भोवले

काय म्हणाला पंकज त्रिपाठीचा भाऊ ?
पंकजचा भाऊ विजेंद्र तिवारी म्हणाला, आमचे वडील बनारस तिवारी आणि आई हेमवती देवीच्या नावे ट्रस्ट केलाय. या ट्रस्टच्या वतीनं वृक्षारोपण केलं आहे. झाडांच्या निगराणीसाठी फाऊंडेशननं माणसं नियुक्त केली आहेत. पुढची पिढी निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त झाडांची गरज आहे.

अंकुश आणि दीपाची ऑफस्क्रीन केमिस्टी ऑनस्क्रीन दिसणार? अंकुश म्हणाला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here