पुणे : पुण्यातील इंदापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने शेतात ओढून नेत, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना बेलवाडी (ता. इंदापुर) येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल हनुमंत जाधव (रा-बेलवाडी, ता. इंदापुर) यासह इतर दोन व्यक्ती यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मौजे बेलवाडी ता. इंदापूर येथील मक्याचे शेतात ही घटना घडली.

नगराध्यक्ष जनतेमधून निवडता, मग मुख्यमंत्र्यांची निवडही थेटच करा, अजितदादांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
आरोपी राहुल जाधव याने पीडित मुलीला जबरदस्तीने मक्याच्या शेतात ओढत नेत अत्याचार केला. काही वेळाने तेथे ओमनी गाडीतून तोंडाला रुमाल बांधलेले दोन व्यक्ती आले व त्यातील एकाने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. यानंतर आरोपींनी तिला गाडीत बसवून बेलवाडी बसस्थानकावर सोडल्याचे मुलीने सांगितले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत आरोपी राहूल जाधव यास अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जी. पी. इंगळे हे करीत आहे.

इंदापूर तालुक्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार सातत्याने वाधत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महिलेच्या सुरक्षिततेवर प्रशचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाचे लक्ष कुठे आहे, नधमांना शिक्षा होत नाही त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra Monsoon Session: आज साईड चेंज केली! जयंत पाटलांकडून शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री खळखळून हसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here