काय आहे सीरिजचं कथानक
रंगा यांनी दिग्दर्शित केलेली ऑटो शंकर ही सीरिज एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारीत आहे. ही व्यक्ती कुकर्म करत असते आणि ते करताना त्याला असुरी आनंद मिळत असतो. परंतु ही कामे करत असताना तो गुन्हेगारीच्या दलदलीत फसत असतो मात्र याची त्याला जाणीवही नसते. ही सीरिज सेक्रेड गेम्स सारखी आहे. गणेश गायतोंडेप्रमाणे या सीरिजमधील शंकर सुद्धा सेक्स लाईफमध्ये आनंद घेणारा आहे.

क्रौर्याची परिसीमा
सीरिजच्या पहिल्या भागाची सुरुवातच मुळी शंकरच्या मृत्यूनं दाखवली आहे. शंकरनं केलेल्या अपराधांसाठी त्याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली असते. हा शंकर रिक्षाचालक. त्याची बायको सुमती आणि मुलांबरोबर गरीबीत रहात असतो. शंकर हा पोलिस अधिकारी कथिरावन (अर्जुन चिदंबरम) याच्यासाठी गुंड बनतो. कथिरावन त्याच्या स्वार्थासाठी शंकरचा वापर करतो. परंतु हळूहळू शंकर देखल बेकायदा दारू व्यवसाय आणि त्यानंतर वेश्या व्यवसायात घुसतो आणि अत्यंत वाईट वृत्तीचा माणूस बनत जातो.
ऑटो शंकरचा ट्रेलर
सेक्स वर्करवर फिदा शंकर
दरम्यान, सीरिजमधील अन्य कलाकारांच्या भूमिका मर्यादित आहेत. चंद्रिका ही सेक्स वर्कर शंकरच्या आवडीची असल्याचं दाखवलं आहे. तिचं काम शंकरचं मनोरंजन करणं हेच आहे. या सीरिजमध्ये सरन्या रवी हिनं शंकरच्या बायकोचा सुमतीची भूमिका केली आहे. सेल्वापांडियनने मोहनची भूमिका साकारली आहे. स्वयं सिद्ध हिनं चंद्रिका साकारली आहे. कथिरावण ही भूमिका अर्जुन चिदम्बरनं साकारली आहे.