Mumbai patra chawl scam | गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात ५ सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

Sanjay Raut feature angry
संजय राऊत, खासदार

हायलाइट्स:

  • राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला
  • सगळी केस खोटी आहे
  • सच के साथ लढ सकते हैं, झूट के साथ नहीं
मुंबई: पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडीच्या कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. सत्र न्यायालयाने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आणखी १४ दिवसांनी वाढवली. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांना सोमवारी सुनावणीसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. इतके दिवस तुरुंगात राहूनही त्यांचा आक्रमक बाणा जराही कमी झालेला दिसला नाही.

यावेळी संजय राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला. सगळी केस खोटी आहे, माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक, फक्त दोन जणांना ओळखतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आगामी काळातही आपण ठामपणे लढत राहू, असे त्यांनी सूचित केले. मी स्वस्थ आहे काहीच त्रास नाही. सच के साथ लढ सकते हैं, झूट के साथ नहीं, असे वक्तव्यही राऊत यांनी केले. संजय राऊत यांना आता ५ सप्टेंबरपर्यंत मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात राहावे लागणार आहे. यादरम्यान संजय राऊत यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
आता मोर्चा रोहित पवारांकडे, मोहित कंबोज यांच्या नव्या ट्विटने पुन्हा खळबळ
दरम्यान, संजय राऊत तुरुंगात मिळत असलेला मोकळा वेळ पुरेपूर वापरून घेत असल्याचे दिसत आहे. संजय राऊत हे तुरुंगात बसून बाहेरच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ते तुरुंगात पुस्तक लिहीत आहेत. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणावर ते पुस्तक लिहित असल्याची माहिती मिळत आहेत. त्यामुळे आता या पुस्तकातून संजय राऊत कोणते गौप्यस्फोट करणार, हे पाहावे लागेल.
नगराध्यक्ष जनतेमधून निवडता, मग मुख्यमंत्र्यांची निवडही थेटच करा, अजितदादांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
दोन महागड्या गाड्यांमुळे संजय राऊत अडचणीत

ईडीने काही दिवसांपूर्वीच मुलुंड, भांडुप व विक्रोळी या परिसरात संजय राऊत यांच्याशी संबंधित असणाऱ्या मालमत्तांवर छापे टाकले होते. यामध्ये मुलुंड येथील श्रद्धा डेव्हलपर्सचाही समावेश होता. ईडीच्या तपासात श्रद्धा डेव्हलपर्स आणि संजय राऊत यांच्यातील हितसंबंध समोर आले होते. संजय राऊत यांच्याकडे असलेल्या दोन महागड्या गाड्या या श्रद्धा डेव्हलपर्सने खरेदी केल्याचे समजते. त्यामुळे संजय राऊत यांची श्रद्धा डेव्हलपर्समध्ये आर्थिक गुंतवणूक असल्याचा संशय ईडीला आहे. ईडी आता त्यादृष्टीने तपास करत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here