उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या खेळावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, “तुम्ही कोणताही खेळाचा प्रस्ताव दिला तर त्याचा विचार सरकार करेल. त्याला प्रतिसाद देत आज पुण्यातल्या स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांकडून गोट्या, पत्ते, दोरी उड्या असे खेळ रस्त्यावर खेळण्यात आला आहे. सरकारी नोकरीच्या जागा रिक्त असताना सरकार नोकर भरती काढत नाही. आज आम्ही चार-चार, पाच-पाच वर्ष अभ्यास करत आहोत. जर सरकारच्या धोरणानुसार आरक्षण मिळणार असेल तर आम्ही पण अभ्यास सोडून अशा खेळांची मागणी करू.
राज्य सरकारने दहीहंडी खेळाला जे आरक्षण दिलं आहे. त्याला निषेध म्हणून आम्ही आज ही पोरखेळ खेळत आहोत. एवढी वर्ष अभ्यास करून आम्ही जर नोकरीसाठी मेहनत करत असू तर काय फायदा. त्यापेक्षा आम्ही असे पोरखेळ खेळून तयारी करतो. सरकारने आता या पोर खेळाला पण आरक्षण द्यावं आम्ही त्याची तयारी करतो, असं संतप्त स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने २०१७ पासून ज्या परीक्षा घेतल्या आहेत त्या सर्व परीक्षांचे निकाल हे प्रलंबित आहेत. असं असताना शासन अशा खेळाला आरक्षण देत आहे. राज्य सरकारने राजकीय दृष्टीकोन समोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचं काम जे केलं आहे, तो निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अशी मागणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.