जसलमेर: पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेले हिंदू पुन्हा पाकिस्तानला परतत आहेत. पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना भारतीयांना नागरिकत्व मिळवताना अडचणी येत आहेत. केंद्र सरकारचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळेल या आशेनं आलेल्या हिंदूंवर पुन्हा पाकिस्तानात परतण्याची वेळ आली आहे. उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीत ३३४ पाकिस्तानी हिंदू शरणार्थी पाकिस्तानला परत गेले.

२०२१ पासून या वर्षीपर्यंत जवळपास १५०० पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानला परत गेले आहेत, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारामुळे पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या पदरी निराशा आली. पाकिस्तानातून आलेल्या अनेक हिंदूंकडे पैसा किंवा संसाधनं नाहीत. त्यामुळे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ते पाकिस्तानला परत जात आहेत, असं सोधा यांनी सांगितलं.
मोदी-शाहांनी गडकरींना संसदीय मंडळातून का काढलं, नक्की काय घडलं? काँग्रेसने सांगितलं कारण
पैसे खर्च करूनही भारतीय नागरिकत्व मिळेल याची खात्री नाही. भारतीय नागरिकत्व हव्या असलेल्या पाकिस्तानी हिंदूंची संख्या जवळपास २५ हजार इतकी आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे पाकिस्तानी हिंदू भारतात राहत आहेत, असं सोधा म्हणाले.

२००४ आणि २००५ मध्ये जवळपास १३ हजार पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यांना नागरिकत्वही मिळालं. मात्र गेल्या ५ वर्षांत केवळ २ हजार पाकिस्तानी हिंदूंनाच नागरिकत्व मिळालं.
मोदींच्या कॅबिनेटमध्ये आता शिंदे गटातील मोहरे, मंत्रिमंडळ विस्तारात दोघांना संधीची शक्यता
पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. भारतीय गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार, नागरिकत्वासाठी अर्ज करताना नुतनीकरण करण्यात आलेला पासपोर्ट आणि पासपोर्ट सरेंडर करत असल्याचं पाकिस्तानी दूतावासाचं प्रमाणपत्र जमा करावं लागतं. पाकिस्तानी दूतावासानं पासपोर्ट नुतनीकरणाच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here