मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला याचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं ए. जी. नाडियादवाला यांचं निधन झाल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळं उपचासांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही महिन्यांपासून ए जी नाडियादवाला मधुमेह आणि दमा यांसारख्या आजारांनी ग्रस्त होते. काल रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आलं होतं. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात तीनं मुलं आणि कुटुंबिय आहेत.
दोघे बाईकवरुन आले आणि…शूटिंगसाठी निघालेल्या मराठी अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
अजय देवगणनं वाहिली श्रद्धांजली
अभिनेता अजय देवगण यानं देखील ए. जी. नाडियादवाला श्रद्धांजली वाहिली आहे. माझे वडिल आणि ए. जी. नाडियादवाला यांनी बॉलिवूडच्या सुवर्णकाळात एकत्र काम केलं होतं, असं म्हणत अजयनं नाडियादवाला कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे.
केतकी चितळेची वणवण थांबली, आता २२ एफआयआर कळवा पोलीस ठाण्यात

ए. जी. नाडियादवाला यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली होती. ९० दशकात त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला होता. १९८४मध्ये त्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तर पहिल्यात चित्रपटात त्यांनी अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री रेखा यांची जोडी मोठ्या पडद्यावर आणली होती. झूठा सच हा त्यांनी निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ-मोठ्या चित्रपटांची निर्मिती करत बॉलिवूडमध्ये गफ्फारभाई अशी ओळख निर्माण केली होती. तसंच ‘हेरा फेरी’, वेलकम यांसारख्या विनोदी चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here