steel glass inserted inside mans private parts by friends: ओदिशाच्या बरहामपूर शहरात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या एका टीमनं तरुणाच्या आतड्यातून स्टीलचा ग्लास बाहेर काढला. तरुणाच्या मित्रांनी पार्टी करत असताना हा ग्लास गुप्तांगात टाकला होता.

गावी परतल्यानंतर तरुणाला असह्य त्रास होऊ लागला. त्याच्या पोटाला सूज आली. नैसर्गिक विधी करताना त्याला अडचणी येऊ लागल्या. त्याचा त्रास पाहून कुटुंबातील सदस्यांनी त्याला एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी तरुणाच्या आतड्यांचा एक्सरे काढला. त्यात त्यांना एक ग्लास आढळून आला. ग्लास पाहून डॉक्टरांना धक्काच बसला.
डॉक्टरांनी सुरुवातीला पार्श्वभागातून ग्लास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे डॉक्टरांनी पीडित व्यक्तीला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्राध्यापक चरण पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक संजीत कुमार नायक, डॉ. सुब्रत बराल, डॉ. सत्यस्वरुप आणि डॉ. प्रतिभा यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. पीडित व्यक्तीच्या आतडी कापून स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. आता पीडित व्यक्तीती प्रकृती स्थिर आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.