साप पकडण्यासाठी संपूर्ण गावात ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. देवेंद्र मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. देवेंद्र यांनी एका सापाची सुटका केली. त्याच सापानं देवेंद्र यांना दंश केला. त्यामुळे देवेंद्र यांचा मृत्यू झाला.

देवेंद्र मिश्रा यांनी सापाला पकडल्यानंतर दोन तासांनंतर सापानं त्यांना दंश केला. हा साप विषारी होता. सापाचं विष देवेंद्र यांच्या शरीरात भिनलं. रुग्णालयात दाखल होण्याऐवजी देवेंद्र यांनी औषधी वनस्पतींच्या मदतीनं घरीच स्वत:वर उपचार करून पाहिले. मात्र ते व्यर्थ ठरले. सर्पदंशानंतर ४ तासांनी त्यांचा मृत्यू झाला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.