सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश NV रमणा येत्या २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रमणा यांनी अनेक वेळा शिंदे गटाला फटकारलं होतं, शिंदे गटाच्या वकिलांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले होते. तसेच काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून त्यांच्या निर्णयाची दिशा स्पष्ट केली होती. या सगळ्यावरुन सरन्यायाधीश रमणा एकनाथ शिंदे गटाला निवृत्त होण्यापूर्वी झटका देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

हायलाइट्स:
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, २४ तासांत दुसऱ्यांदा सुनावणी लांबणीवर
- सुप्रीम कोर्टाच्या पूरक यादीमध्ये महाराष्ट्राचे कामकाज उद्यासाठी समाविष्ट नाही
- सरन्यायाधीशांची निवृत्ती तोंडावर, जस्टीस रमणा धनुष्य कोणाच्या हाती सोपवणार?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश NV रमणा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होते आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या परस्परविरोधी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. याआधी १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने १० दिवस लांबणीवर टाकली होती. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होण्याची अपेक्षा होती. पण त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायमूर्ती आज उपस्थित नसल्याने काल ही सुनावणी पुढे ढकलली होती. आजही सुप्रीम कोर्टाच्या सप्लीमेंट्री लिस्ट (पूरक यादी) मध्ये महाराष्ट्राचे कामकाज उद्यासाठी समाविष्ट नसल्याने उद्याही सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश NV रमणा येत्या २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रमणा यांनी अनेक वेळा शिंदे गटाला फटकारलं होतं, शिंदे गटाच्या वकिलांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले होते. तसेच काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून त्यांच्या निर्णयाची दिशा स्पष्ट केली होती. या सगळ्यावरुन सरन्यायाधीश रमणा एकनाथ शिंदे गटाला निवृत्त होण्यापूर्वी झटका देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र वारंवार सुनावणी लांबत असल्याने रमणा यांच्या कारकीर्दीत ही सुनावणी होणार की नाही?, हा मोठा प्रश्न आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network