रत्नागिरी : मागील नऊ दिवस बेपत्ता असलेले लांजा तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसन्न दीक्षित यांचा मृतदेह सोमवारी २२ ऑगस्ट रोजी रावारी आणि बापेरे गावच्या सीमेवर असलेल्या जंगलात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे त्यांनी अखेर आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

लांजा तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील रहिवासी आणि भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या प्रसन्न रामकृष्ण दीक्षित (वय ५०) हे घरगुती भांडणातून दिनांक १२ ऑगस्ट रोजी घरात कोणालाही न सांगता सकाळी निघून गेले होते. त्यामुळे कुटुंबीय आणि गावातील लोकांनी त्यांचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांच्या वतीने प्रसन्न दीक्षित हे बेपत्ता झाल्याची फिर्याद अखेर लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र नऊ दिवस उलटून गेले तरी त्यांचा शोध लागला नव्हता.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच स्वतंत्र वीज पुरवठा कंपनी; देशातील पहिलाच प्रयोग

अखेर सोमवारी २२ ऑगस्ट रोजी तब्बल १० दिवसानंतर त्यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत रावरी बापेरे गावच्या सीमेवर असलेल्या जंगलात आढळून आला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट झालं आहे. दीक्षित यांनी आत्महत्या केल्याने लांजा शहरासह तालुक्यातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबई-पुणे महामार्ग आठपदरी होणार?; लवकरच इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवणार

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here