uddhav thackeray, उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपचं चॅलेंज स्वीकारलं; आक्रमक इशारा देत केली मोठी घोषणा – uddhav thackeray accepts bjp and rebel shivsena mlas challenge aggressive warning to bjp leaders
मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार-खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भवितव्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून भूमिका मांडत शिंदे यांच्यासह भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करत भाजपला खुलं आव्हान दिलं आहे.
‘शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिंदे गटाचे मुख्यमंत्रिपद हा साबणाचा बुडबुडा आहे. महाराष्ट्रात चीड आहे, संताप आहे. आम्ही शिवसेनेच्या उपनेत्यांना महाराष्ट्रात पाठवलं आहे. आदित्य चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे. लवकरच आम्ही स्वतः महाराष्ट्र पिंजून नव्हे तर घुसळून काढणार आहोत. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊच, पण शिवसेना फोडणाऱ्यांनाही याच जमिनीत गाडून दाखवू,’ असा आक्रमक इशारा सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. माझ्या आईसारखंच मलाही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय: करुणा शर्मा
भाजपला प्रतिआव्हान
खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या दाव्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या,’ असं प्रतिआव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वाला दिलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोक गाठणार, हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.