bhopal madhya pradesh rain news, Weather Alert : पावसाचा हाहाकार! पुराने संपूर्ण गावाला वेढा, २०० हून अधिक नागरिक अडकले – weather forecast bhopal more than 200 citizens were trapped in flood waters in bhopal madhya pradesh
हिंगोली : राज्यासह देशभर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. बऱ्याच राज्यांमध्ये धुवांधार पावसामुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी गेल्या ३ दिवसांपासून रेड अलर्ट जारी केला आहे. काल बावडी कला या क्षेत्रामध्ये एका धरणाची गेट खुली करण्यात आल्यामुळे बावडी कला हा परिसर पाण्याखाली गेला असून घरे व बिल्डिंग पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे २०० हून अधिक नागरिक पूरात अडकले असून आतापर्यंत एनडीआरएफच्या जवानांना ६३ व्यक्तींना सुखरूप स्थळी पोहोचण्यात यश आले आहे. यामध्ये तीन कुत्र्यांना सुद्धा वाचवण्यात यश आले आहे. याबरोबर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी मध्य प्रदेश या राज्यांमध्ये बरेच ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डिलिव्हरी बॉय एका झटक्यात कसा काय झाला करोडपती; २ कोटींची गाडी, दुबईला बंगला… जोपर्यंत सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचले जात नाही तोपर्यंत एनडीआरएफच्या जवानाचे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे. दरम्यान, बचाव कार्यामध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून कार्यरत असलेल्या हिंगोलीच्या छोट्याशा हट्टा गावातील बाळासाहेब खीस्ते या जवानाचा सहभाग आहे.
६ राज्यांमध्ये ४८ तासांपासून मुसळधार पाऊस
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोपाळमध्ये ६ वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाला आहे. एका मोठ्या तलावात क्रूझ बुडाली असून ५० धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. मध्य प्रदेशसह देशातील ६ राज्यांमध्ये ४८ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भोपाळमध्ये आतापर्यंत ६० इंच पाऊस झाला आहे.
हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या मान्सून अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ०१ जून ते २२ ऑगस्टपर्यंत २४९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ४४४ जखमी आणि १० बेपत्ता आहेत तर पावसामुळे ७१५ घरांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात १३३७ कोटींचं एकूण नुकसान झालं आहे.