फोन केलेल्या व्यक्तीने हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. खंडणी न मिळाल्यास हॉटेल उडवून देऊ अशी धमकी त्याने दिली. यानंतर हॉटेलमध्ये एकच धावपळ पाहायला मिळाली. तातडीने संपूर्ण सुरक्षा यंत्रणाकडून हॉटेलची झडती घेतली असता कुठेही बॉम्ब आढळून आला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये झडती घेतली असता बॉम्ब सापडला नाही आणि तो फेक कॉल होता, अशी पुष्टी पोलिसांनी केली आहे तर सध्या धमकी देणाऱ्या कॉलरचा शोध घेतला जात आहे. काही अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून मुंबईतील ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले.
बॉम्बचा स्फोट होऊ नये यासाठी फोन करणाऱ्याने हॉटेल प्रशासनाकडे ५ कोटी रुपये मागितले. हॉटेलने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी सर्वत्र तपास केला. मात्र, पोलिसांना काहीही सापडले नाही, त्यानंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३८५, ३३६, ५०७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.