सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं…
घटनेनंतर पोलिसांनी पांडे यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन त्यांना घटनेची माहिती दिली. सुरेश पांडे यांचा मुलगा जिल्हा रुग्णालयात आला असता, पांडे हे मनोरुग्ण असून त्यातून त्यांनी हा प्रकार केला असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पांडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये म्हटलं आहे की, ‘एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करत आहे. यात कोणीही दोषी नाही. मला ९० टक्के दिसत नाही. या आजारपणाचा आता कंटाळा आला आहे. मी स्वत: जबाबदार आहे, धन्यवाद,’ असं आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुरेश पांडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आढळून आलं आहे.
Home Maharashtra Suicide Attempt news, उद्यानात बसलेल्या वृद्ध व्यक्तीने अचानक स्वत:च्या हातावर केले ब्लेडने...
Suicide Attempt news, उद्यानात बसलेल्या वृद्ध व्यक्तीने अचानक स्वत:च्या हातावर केले ब्लेडने वार; सुसाईड नोट सापडली! – a 72 year old man attempted suicide by stabbing himself with a blade in the park
जळगाव : सुसाईड नोट लिहीत वृद्ध व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास जळगाव शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरेश रघुनाथ पांडे (वय, ७२) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.