मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच अजित पवार यांनी विविध मंत्री आणि सत्तापक्षातील आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केला. आजही सभागृहाचं कामकाज सुरू असताना अजित पवार यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय समजले जाणारे आमदार अभिमन्यू पवार यांना माफी मागण्यास भाग पाडलं आहे.
अभिमन्यू पवार यांची वेलमध्ये येऊन बोलू न दिल्याबद्दल तालिका अध्यक्षांना जाब विचारला. मात्र तालुका अध्यक्षांबाबत घेतलेली ही आक्रमक भूमिका अजित पवार यांना पटली नाही आणि त्यांनी कडक शब्दांत अभिमन्यू पवार यांना सुनावलं. ‘हे वागणं बरं नाही, तुम्ही सरकारमध्ये आहात, तालिका अध्यक्षांना विधानसभा अध्यक्षांएवढाच मान असतो, त्यांना धमकावणं योग्य नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांनी समज दिल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी माफी मागितली. सगळेच रिक्षाचालक बेईमान नसतात; शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदेंवर बोचरी टीका
दरम्यान, शिरीष चौधरी हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
अभिमन्यू पवार पुन्हा संतापले
आधी प्रश्न विचारु न दिल्यामुळे अभिमन्यू पवार यांनी आपली जागा सोडत पुढे येऊन तालिका अध्यक्षांना जाब विचारला होता. त्यानंतर अजित पवारांनी समज दिल्यानंतर माफी मागत अभिमन्यू पवार पुन्हा आपल्या जागी जाऊन बसले. मात्र काही वेळाने तालिका अध्यक्षांनी अभिमन्यू पवार यांनी प्रश्न विचारण्याची संधी दिली. पण मला ज्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा ते मंत्रीच इथे नाहीत, त्यामुळे आता संधी देऊन काय उपयोग, असं म्हणत अभिमन्यू पवार पुन्हा संतापले.
‘मी सकाळी सकाळी अंघोळ करुन लवकर आलो, तरी मला बोलू दिलं नाही, मी तुमचं काय वाईट केलंय,’ असा जाब अभिमन्यू पवार यांनी तालिका अध्यक्षांना विचारला.