मुंबई : मुंबई – पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल परिसरात मधल्या लेनवर आज पहाटे चार वाजण्याच्या ( Mumbai Pune Railway Track ) सुमारास दरड कोसळली. पण यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरडीतील एक मोठा दगड रेल्वेच्या इंजिनाखाली आल्याचं समोर आलं आहे. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. या रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. आज पुन्हा दरड कोसळली आहे. ट्रेनच्या इंजिनाखाली दगड आल्याने इंजिन रुळावरून घसरले आहे.

घाटातील गस्त घालणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्याने या दुर्घटनेची माहिती सर्वप्रथम दिली. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज आहे. या दुर्घटनेत मेल एक्स्प्रेसची वाहतूक करणाऱ्या पर्यायी इंजिनचे (बँकर) मोठे नुकसान झाले. धुके, अंधार आणि मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याचे काम धीम्या गतीने सुरू होते. सकाळी साडे सातला दरड हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. सध्या ३० किमी प्रतीतास या वेगमर्यादेसह मेल एक्स्प्रेस रवाना होत आहेत.

mumbai pune railway route

मुंबई – पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली


मंकी हिल्स येथे रेल्व मार्ग डोंगरातून जात असल्याने या भागात पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते. विशेष करून पावसाळ्यात अशा घटना अधिक घडतात. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस सुरू आहे. पुढचे काही दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.

landslide on railway track

ट्रेनच्या इंजिनाखाली आला भलामोठा दगड

चाकरमान्यांसाठी गुड न्यूज; गणपतीला कोकणात जाण्यासाठी ‘एलटीटी’ येथून विशेष रेल्वेगाड्या

मुंबई – पुणे रेल्वे मार्गावर ११ तारखेला दरड कोसळली होती. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी अनेक गाड्या खोळंबल्या होत्या. सतत सुरू असलेल्या पावसाने पुन्हा रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. दुसरीकडे, प्रशासनाने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरून घाट माथ्याच्या परिसरातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here