Maharashtra assembly Session | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. उद्धव ठाकरे हे मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बैठीकीसाठी विधिमंडळात येतील. उद्धव ठाकरे याठिकाणी आल्यास शिवसेना आमदारांमध्ये उत्साह संचारू शकतो.

हायलाइट्स:
- पावसाळी अधिवेशनाचे तीन दिवस शिल्लक आहेत
- सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे
- उद्धव ठाकरे हे सभागृहात जाणार नाहीत
राज्यातील सत्तापालटानंतर विधिमंडळात होणारी ही महाविकास आघाडीची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठीकाला उद्धव ठाकरे,अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकासआघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. त्यामुळे आजच्या या बैठकीत काय रणनीती ठरणार, हे पाहावे लागले. आजचा दिवस पकडून पावसाळी अधिवेशनाचे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे उद्या किंवा परवा सभागृहात पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना विधानपरिषद सदस्यत्त्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय बदलला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बुधवारी आणि गुरुवार या दोन दिवसांत सभागृहात उपस्थित राहणार का, हे बघावे लागले.
उद्धव ठाकरे हे मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बैठीकीसाठी विधिमंडळात येतील. उद्धव ठाकरे याठिकाणी आल्यास शिवसेना आमदारांमध्ये उत्साह संचारू शकतो. त्यामुळे संध्याकाळी विधिमंडळाच्या आवारात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात उपस्थिती लावली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि ईडीवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सभागृहात येऊन अशीच फटकेबाजी करणार का,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network