जालना : जालन्यात स्वामी समर्थांचं जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावातील घनसावंगीमधील जामसमर्थ मंदिरातून पंचधातूंच्या ६ मूर्ती सोमवारी चोरीला गेल्या. या चोरीनंतर गावात एकच शोककळा पसरली आहे. रोज मंदिरात आरतीने गावकऱ्यांची सकाळ होते. दिवसाला सुरुवात होते. पण मंदिरात देवच राहिले नसल्याने गावकऱ्यांमध्ये निराशा आहे. यामुळे संतापलेले गावकरी आता अन्नत्याग करणार असल्याची माहिती आहे.

मंदिरातील शेकडो वर्षांचा ठेवा चोरट्यांनी लंपास केल्यानं भाविकांमध्ये संतापाची लाट आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात चोरी ही झाली. सकाळी घटना उघडकीस येताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आता मूर्तींचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्रात प्राचीन तलावाच्या खोदकामात सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग, पाहा PHOTOS

गावकरी करणार अन्नत्याग…

दरम्यान, मूर्ती चोरीचा निषेध म्हणून गावकरी २४ ऑगस्टला एक दिवस अन्नत्याग करण्याच्या तयारीत आहेत. खरंतर, मंदिरात दररोज सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजता आरती होते. पण आजची पहाट गावकऱ्यांसाठी निराशा ठरली. आज सकाळची आरती झालीच नाही तर संध्याकाळचीही आरती होऊ शकणार नाही. मंदिरात देवच नसतील तर कोणाची आरती, असा प्रश्न भाविक आणि ग्रामस्थ विचारत आहेत.

राम मंदिरातून पंचधातूंच्या ६ मूर्ती चोरीला

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील प्रसिद्ध जांबसमर्थ येथील राममंदिरातून पंचधातूंच्या ६ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना मूर्ती लवकरात लवकर शोधून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील हजारो वर्षांपूर्वीच्या मूर्ती आज पहाटे चोरीला गेल्या.

तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी १५३५ मध्ये या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. पंचधातूमध्ये असलेल्या या मूर्ती आजही सुस्थितीत आहेत. काल रात्री मंदिर बंद झाल्यानंतर मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्या.

मुंबई अलर्टवर! ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी, ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती…
मूर्ती शोधून काढण्याचं मोठं पोलीसांसमोर आव्हान

राम, लक्ष्मण, सीता आणि पंचायतन असा पुरातन, अमूल्य ठेवा चोरट्यांनी शिताफीने चोरून नेला. घटनास्थळी घनसांगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी धाव घेत पाहणी केली आहे. महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातील चोरी शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here