म्हस्के यांना जाताना पाहताच तरूणींनी त्यांना आवाज देत थांबविले आणि तीन चार मुले आमची छेड काढून आम्हाला मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यांच्याजवळ आमची दुचाकी आहे, असंही त्या तरूणींनी सांगितलं. त्यावर लगेच ११२ क्रमांकावर कॉल करा असे म्हस्के यांनी तरूणींना सांगितले. यावेळी आरोपी तिथे आले आणि तू मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करतो का… म्हणत सर्व आरोपींनी पोलीस कर्मचारी म्हस्के यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते जखमी झाले.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विद्यापीठ परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.