उस्मानाबाद: सततच्या भांडणाला कंटाळून एका दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. खासगी कर्ज फेडण्यासाठी त्यांनी जमीन विकली होती. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. याच उद्रेकातून दोघांनी टोकाचं पाऊल उचललं. कळंब तालुक्यातील नायगावमध्ये ही घटना घडली.

दीक्षित कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी (ता.२१) रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी अडूला एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मित्रांनी गुप्तांगात टाकला स्टीलचा ग्लास; नऊ दिवस प्रचंड वेदना, दहाव्या दिवशी…
प्रकाश वसंत दीक्षित (वय ३० वर्षे) तर अश्विनी प्रकाश दीक्षित (वय २७ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. त्यांच्या पश्चात आई, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी सोमवारी दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

लोकांचे खाजगी कर्ज फेडण्यासाठी चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली म्हणून प्रकाश आणि अश्विनी यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचे, असं प्रकाश यांच्या आई रतन दीक्षित यांनी सांगितलं. या प्रकरणी शिराढोण पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कोणी तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही. दीक्षित कुटुंब ८ दिवसांपूर्वीच पुण्याहून नायगावला राहायला आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here