maharashtra breaking news today, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धोक्यात, स्टेशनवर दोघांची तपासणी करताच पोलीस हादरले – a 12 pistols found with two in jalgaon a big action by the police in the wake of ganeshotsav
जळगाव : चोपडा शहरात तब्बल १२ गावठी कट्टे मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. गावठी कट्ट्यांसह हरियाणाच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. अमीतकुमार धनपत धानिया (वय ३० रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरियाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय ३२ रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरियाणा) अशी दोघा संशयीतांची नावे आहेत. (Mharashtra Jalgaon News Today)
मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी सांयकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानक परिसरात संशयित अमीतकुमार धनपत धानिया आणि शनेशकुमार रामचंदर तक्षक यांच्याकडे २ लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच हजार रुपये किंमतीची ५ पिवळ्या धातुचे जिवंत काडतूस असून हे कोणास तरी विक्री करण्यासाठी आणले असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. मुंबई अलर्टवर! ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी, ४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती…
यानुसार पोलिसांनी दोघांना सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. दोन्ही संशयित आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे संशयित आरोपींजवळून तब्बल १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस आणि ३ मोबाईल फोन असा एकूण २ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली.