अहमदनगर : चहा हे असं पेय आहे, सकाळी उठल्यावर सर्वांना चहा हवी असते. चहाविना बहुतांश लोकांची सकाळ होत नाही. त्यातही आता लेमन टी, ग्रीन टी, आल्याचा चहा यांसारखे चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. मात्र, तुम्ही विचारही केला नसेल, एका चहा विक्रेत्याने चक्क सोन्याच्या कपात चहा विकायला सुरूवात केली आहे.

सोन्याच्या कपात चहा…आश्चर्य वाटतंय ना…होय हे खरं आहे. नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात प्रेमाचा चहा मिळतोय तेही सोन्याच्या कपात. या सोन्याच्या कपाची चर्चा संपुर्ण नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय सैन्य दलातील जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना चहाविक्रेते मोफत चहा देतात. पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी आपल्या दुकानात सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याचे सुरू केले आहे. सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनविले आहेत.
स्वप्नील यांना सोनं आणि चहा या दोन गोष्टी खूप आवडतात. दोन वर्षापासून त्यांची सामान्य माणसाला सोन्याच्या कपातून चहा द्यावा अशी इच्छा होती. त्यांनी ही कल्पना सत्यात उतरवली आहे.

पुण्याला जाण्यापूर्वी राज ठाकरेंचा मनसेच्या नेत्यांना सज्जड इशारा, ‘एकमेकांची उणीदुणी काढलीत तर….’
या माध्यमातून त्यांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोन्याच्या कपात हा चहा प्यायला मिळत आहे. तसेच येथे येणाऱ्या ग्राहकांची सोन्याच्या कपात चहा पिण्याची इच्छा पूर्ण होत आहे.

अनेकांना वाटत असेल की, सोन्याच्या कपात चहा विकली जात आहे. म्हणजे या चहाची किंमत देखील महाग असेल. सोान्याच्या कपात विकल्या जाणाऱ्या चहाच्या किंमतीबाबत अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल. मात्र, असं काहीही नाही. एरवी ज्या दरात चही विकली जाते त्याच दरात पारनेर तालु्क्यातील स्वप्नील पुजारी यांच्या चहाच्या दुकानात सोन्याच्या कपात ही चहा ग्राहकांना प्यायला मिळत आहे.

शिंदे गट, फिंदे गट काय नाही, ओरीजनल शिवसेना आमचीच, संतोष बांगरांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here