नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा पुरवठादार असलेल्या इन्फोसिसने मार्जिनमध्ये कपात केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे परिवर्तनीय वेतन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा निव्वळ नफाही कमी झाला असून त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमतही घसरली आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल २५ रुपयांनी घसरली.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले की, गेल्या तिमाहीत नफा कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना परिवर्तनीय वेतन दिले जाणार नाही. कंपनीच्या या निर्णयामुळे तेथे काम करणाऱ्या ३ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.

मंदीचा पहिला मोठा दणका; जगातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपनीकडून कर्मचारी कपात

भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची अवस्था बिकट!
सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये विप्रो आणि टीसीएसने मार्जिनमध्ये घट केल्यामुळे जून तिमाहीत त्यांच्या कर्मचार्‍यांचे व्हेरिएबल पेमेंट आधीच कमी केले आहे किंवा पुढे ढकलले आहे. आता या मालिकेत इन्फोसिसही सामील झाली आहे. महागाईचा दुहेरी दबाव कंपनीवर निर्माण होत आहे. कर्मचार्‍यांचा पगार वाढल्याने आणि नवीन लोकांना कामावर ठेवल्यामुळे कंपनीला जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे सॉफ्टवेअरची मागणीही कमी झाली असून, त्यामुळे कंपनीचे मार्जिनही कमी होत आहे.

देशाच्या विकास दराबाबत माजी गव्हर्नर सुब्बराव स्पष्टच बोलले; अर्थव्यवस्था…

प्रत्येक तिमाहीत कंपनीचे मार्जिन कमी
जून तिमाहीत इन्फोसिसचे मार्जिन २० टक्क्यांवर घसरले. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते २३ टक्क्यांच्या जवळपास होते. त्याचवेळी, या वर्षी मार्च तिमाहीत कंपनीचे मार्जिन २१ टक्के होते. कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ३ लाख ३५ हजारांच्या जवळपास आहे.

कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; दिग्गज कंपनीने दिला इशारा, लवकरच होणार कर्मचारी कपात
व्हेरिएबलचे काय असते?
परिवर्तनीय वेतन तुमच्या आणि तुमच्या कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असते. नावाप्रमाणेच हे पेमेंट कामगिरीच्या आधारे केले जाते. हे पेमेंट कर्मचार्‍यांना नियमित कामापेक्षा जास्त काम केल्यामुळे किंवा चांगले काम केल्यामुळे केले जाते. आजकाल कंपन्या परफॉर्मन्स कल्चर चांगले करण्यासाठी व्हेरिएबल पे अधिक वापरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here