पश्चिम आफ्रिकेत असलेल्या घाना देशातील एका शेतकऱ्यासोबत भीषण प्रकार घडला आहे. एका स्वप्नामुळे शेतकरी प्रत्यक्षात जखमी झाला. आपल्या पत्नीसाठी बकरा कापत असल्याचं स्वप्न शेतकऱ्याला पडलं. मात्र प्रत्यक्षात त्यानं स्वत:चं गुप्तांग कापलं

 

man cuts his penis
घाना: पश्चिम आफ्रिकेत असलेल्या घाना देशातील एका शेतकऱ्यासोबत भीषण प्रकार घडला आहे. एका स्वप्नामुळे शेतकरी प्रत्यक्षात जखमी झाला. आपल्या पत्नीसाठी बकरा कापत असल्याचं स्वप्न शेतकऱ्याला पडलं. मात्र प्रत्यक्षात त्यानं स्वत:चं गुप्तांग कापलं. त्यामुळे शेतकरी रक्तबंबाळ झाला. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

कोफी अट्टा असं शेतकऱ्याचं नाव असून तो ४७ वर्षांचा आहे. कोफी उठला त्यावेळी तो रक्तबंबाळ झाला होता. त्यानं गुप्तांगासोबत वृषणाची पिशवीदेखील कापली होती. हा प्रकार घडला, त्यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. घरी परतल्यावर तिला घडलेला प्रकार समजला. तिला जबर धक्का बसला. रक्तस्राव थांबवण्यासाठी तिनं डायपरचा वापर केला. त्यानंतर तिनं पतीला रुग्णालयात दाखल केलं. झालेला प्रकार ऐकून आणि कोफीची अवस्था पाहून डॉक्टरांनादेखील धक्का बसला.
मित्रांनी गुप्तांगात टाकला स्टीलचा ग्लास; नऊ दिवस प्रचंड वेदना, दहाव्या दिवशी…
कोफीवर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी तो पैसे गोळा करत आहे. ‘मी खुर्चीत बसलो. त्यावेळी मला झोप लागली. माझ्या समोर बकरा आहे आणि तो मी कापतोय, असं स्वप्न मला पडलं,’ असं कोफीनं सांगितलं. कोफी स्वप्न पाहत असताना त्याच्या शेजारीच एक चाकू होता. बकरा कापत असल्याचं स्वप्न पाहता पाहता कोफीनं बाजूलाच असलेला चाकू हाती घेतला. याच चाकूमुळे कोफीच्या गुप्तांगाला इजा झाली.
मी याची सुटका केलीय! सापाला गळ्यात टाकून गावभर फिरला; शेवट भयंकर झाला
कोफीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला त्यावेळी त्याची पत्नी अडवोआ कोनाडू प्रवास करत होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं तिला घडलेल्या घटनेची माहिती दिली. कोफीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here