हेही वाचा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धोक्यात, स्टेशनवर दोघांची तपासणी करताच पोलीस हादरले
खरंतर, या महागणपतीला तब्बल ६६ किलो सोन्याचे दागिने आणि २९५ किलोहून अधिक चांदी व इतर मौल्यवान वस्तूंनी सजवण्यात येतं. या मोठ्या विम्याच्या प्रीमियमची रक्कम जाहीर करण्यास मंडळाने नकार दिला आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘३१६.४० कोटी रुपयांच्या विम्यामध्ये अनेक प्रकारच्या जोखमींना कव्हर करण्यात आलं आहे. यामध्ये ३१.९७ कोटी रुपयांमध्ये सोने, चांदी आणि मूर्तीची सजावट करणाऱ्या दागिन्यांचा समावेश आहे. तर मंडळासाठी काम करणारे स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, फुटवेअर स्टॉलचे कर्मचारी, पार्किंग कामगार आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास सुरक्षा रक्षक यांच्यासाठी २६३ कोटी रुपयांची सर्वात मोठी रक्कम कव्हरच्या स्वरूपात समाविष्ट आहे.
एका प्रवक्त्याने सांगितले की, “आग आणि भूकंपामुळे झालेल्या नुकसानीच्या वस्तू जसे की फर्निचर, इतर फिटिंग्ज, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर, भांडी, फळे आणि भाजीपाला इत्यादींसाठी १ कोटी रुपये आहेत.” GSB किंग्ज सर्कल २९ ऑगस्ट रोजी ‘विराट दर्शन’ कार्यक्रमात आपल्या गणपतीचा पहिला देखावणार असल्याचीही माहिती प्रवक्त्याने दिली.