देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण, औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोटं लागले आहे. औरंगाबादजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्यासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मद्यप्राशन करुन परतताना BMW विहिरीत पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबादमधील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातातमधील पाचही जण औरंगाबादमधील रोकडा हनुमान कॉलनीमधील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. एमएच 20 इएफ 0707 या क्रमांकाच्या BMWने पाचही जण मध्यपान करून निघाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here