मध्य दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रिझवान नावाच्या एका खाटिकानं ३ ऑगस्टला ८ वर्षांच्या एका मुलीचं यमुना खादर परिसरातून अपहरण केलं. यानंतर त्यानं मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. मुलीचा मृतदेह त्यानं यमुना नदीत फेकून दिला.

महिलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तो मृतदेह बेपत्ता असलेल्या ८ वर्षांच्या मुलीचा असल्याचं तपासातून स्पष्ट झालं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं.
पोलिसांनी गुन्हेगाराला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनेकांची चौकशी केली. अखेर आरोपी रिझवानला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझवान पेशानं खाटिक आहे. या प्रकरणाची दिल्ली महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर देण्यास सांगितलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.