तक्रादार यांचे शेतीचा साताबारा उतारावर नाव बदलून मिळावे याकरिता तक्रादार यांनी त्यांचे पिंपळे (होळनांथे) गावाच्या कार्यालयातील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे (वय ४५) पिंपळे (होळनांथे) यांच्याकडे अर्ज करुन यांची भेट घेतली. तलाठी बोरसे यांनी सातबारा उतारावर नाव बदलून देण्याकरिता सदर तक्रादार त्यांच्याकडे ८०० रुपयाची लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाच देण्यास नकार दिला. मात्र, पैसे दिले नाही तर नाव बदलून मिळणार नाही असे सांगत सदर तलाठी यांनी त्यांचे ज्ञानेश्वर बोरसे यांनी थांबवून ठेवले.
या सर्व गंभीर प्रकाराबद्दल तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाला घडलेला सर्व गंभीर प्रकार सांगितला यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दाखल करून घेतली. सदर तक्रारीवरुन आज पडताळणी केली असता त्यांनी सातबारा उतारावर नाव बदलून देण्यासाठी ८०० रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सदर लाचेची रक्कम लागलीच आणून देण्याबाबत सांगितल्याने त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठी ज्ञानेश्वर बोरसे यांना रंगे हाथ ताब्यात घेतलं आहे.
सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली आहे.