मुंबई: गौतम अदानी समूहाकडून सध्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तार सुरू आहे. अनेक नव्या बाजारपेठांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये कंपनी पाऊल टाकत आहे. कर्जाच्या जोरावर अदानी समूह करत असलेल्या वाटचालीवर, विस्तारावर फिच रेटिंग्सची आर्थिक सेवेशी संबंधित कंपनी क्रेडिटसाईट्सनं चिंता व्यक्त केली आहे.

क्रेडिटसाईट्सनं अदानी समूहाच्या आर्थिक स्थितीबद्दल एक अहवाल तयार केला आहे. यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सच्या दरांत मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. अदानी पॉवर, अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे लोअर सर्किट लावण्याची वेळ आली.
ग्रेट भेट! ४ वर्षे संवाद, आज मीटिंग झालीच; मस्क यांच्या शेजारी असलेला मराठमोळा तरुण कोण?
अहवाल काय सांगतो?
अदानी समूह अतिशय आक्रमकपणे सातत्यानं विस्तार करत आहे. त्यामुळे कंपनीवर आर्थिक दबाव वाढत आहे. अधिक भांडवलाची आवश्यकत असलेल्या क्षेत्रांमध्ये समूह पावलं टाकत आहे. प्रमोटर्सकडून समूहातील कंपन्यांमध्ये अतिशय कमी भांडवल गुंतवलं जात आहे, असं क्रेडिटसाईट्सनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. बाजारात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी अदानी समूह आणि मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याचा धोका वाढत चालला आहे.

अदानी समूहावर खूप मोठं कर्ज आहे. आपल्या परिस्थितीचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नांचा समूहावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कंपनी कर्जाच्या जाळ्यात अडकू शकते. , असा धोका क्रेडिटसाईट्सनं सांगितला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बापमाणूस! गळ्यात लेक, हाताशी पोरगा! झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर ही वेळ का आली?
क्रेडिटसाईट्सचा अहवाल येताच अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळले. सात कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. अदानी ग्रीन एनर्जी (३.६२ टक्के), अदानी पॉवर (५ टक्के), अदानी विल्मर (३.८७ टक्के), अदानी ट्रान्समिशन (०.६२ टक्के), अदानी पोर्ट्स (०.९० टक्के), अदानी इंटरप्रायझेस (०.८७ टक्के) या कंपन्यांचे शेअर्स घसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here