gujarat bjp mla threatens police during ganesh procession in valsad: गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार भरत पटेल यांनी पोलिसांना धमकी दिली आहे. भाजप आमदार आणि पोलिसांमध्ये बराच वेळ वाद झाला. वलसाडमधील तिथल रोड परिसरात हा प्रकार घडला. गणेश मूर्ती घेऊन जात असताना ही घटना घडली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच भरत पटेल मिरवणुकीजवळ पोहोचले. पटेल आणि पोलिसांमध्ये बराच वेळ बातचीत झाली. व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी आमदारांना मदत करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. यावेळी आमदारांनी दादागिरी करत पोलिसांनाच धमकी दिली. शिवीगाळ केली. त्यांनी पोलिसांना थेट दंगल घडवण्याची धमकी दिली. मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी दंगली घडवू शकतो, असं पटेल म्हणाले. मात्र पटेल यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. पोलीस खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.