लोणावळा: अनिल परब यांनी दापोली समुद्र किनारा लगत केलेल्या बेकायदेशीर रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचे आदेश केंद्राने नुकतेच दिले आहे. परब यांचे बेकायदेशीर बांधकाम जरी पडले, तरीही आम्ही शांत बसणार नाही. तर या जागेच्या खरेदी व बांधकामासाठी एवढे पैसे कोठून आले याचीही चौकशी केली जाईल, असे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला. आता डावा हातही जेलमध्ये जाणार. समझने वाले को इशारा काफी है, असे सूचक वक्तव्य सोमय्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केले. या संदर्भात फडणवीस-शिंदे सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे खळबळजनक विधानही त्यांनी केले. लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नगरसेवक व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील इंगुळकर, कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका कांचन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुधीर पारिठे, बहुजन विकास आघाडीचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल काकडे यांच्यासह अनेक तरुण व महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
आमदार गेले, खासदार गेले, पण ठाकरी बाणा कायम, उद्धव यांचं महत्त्वाच्या कारणासाठी विधान भवनात पाऊल
मुंबईत कोविड सेंटरच्या कामात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा पैसा कुठून आला आणि कुठे गेला हे लवकरच जाहीर करणार आहे. चोरी केलेला चोरीचा माल परत करावाच लागेल व सगळ्यांचा हिशोब होणार असा इशारा सोमय्यांनी दिला.

नेत्यांनादेखील अहंकार असतो. पण इतका अहंकार चांगला नाही. उद्धव ठाकरे यांचं सरकार हे माफियाराज होतं. एका कुटुंबाचं भर चौकात मुंडन केलं. माजी नौदल अधिकाऱ्याने एक पोस्ट टाकली, तर त्यालाही घरी जाऊन मारलं. माझ्या आई, बायको व मुलाला जेलमध्ये टाकायला निघाले होते. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. पण ज्यांनी हे आरोप केले, जेलमध्ये टाकण्याच्या वल्गना केल्या, तेच जेलमध्ये गेले, असा टोला सोमय्या यांनी ‌राऊत यांचे नाव न घेता लगावला.
जेव्हा पाहिजे तेव्हा दंगल घडवू शकतो! गणेशोत्सवावरून भाजप आमदाराची पोलिसांना थेट धमकी
नितीन गडकरींना कोणीही ओळळत नव्हतं. त्यांना नाव देण्याचं काम भाजपने केलं. पण गडकरींनी अविरतपणे काम करून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या कामांमुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील जनता रोडकरी गडकरी या नावाने ओळखू लागली आहे. माणूस नावाने नाही, तर तो त्यांच्या कामानं ओळखला जातो. प्रत्येकाने गडकरींच्या कार्याचा व कल्पकतेचा आदर्श घ्यावा, असे सोमय्या म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here