रत्नागिरी : अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणशोत्सावासाठी कोकण रेल्वे महामंडळाने खास चाकरमान्यांच्या सोयीकरता आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मार्गावरील काही गाड्यांमध्ये २ एसी टू टीयर कोच, २ एसी थ्री टीयर कोच आणि १ एसी चेअर कार कोच तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढवण्यात आलेला रेल्वे कोचचा तपशील खालीलप्रमाणे आहेत :-

२ एसी – टू टीयर कोच, २ एसी – थ्री टीयर कोच आणि १ एसी – चेअर कार कोच ट्रेन क्र. ११०९९ /१११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शनमधील १२ एलएचबी कोचच्या विद्यमान रचनेत वाढवले आहेत. लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. ११०८५ / ११०८६ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस. पुढील दिवशी १७ एलएचबी कोचच्या सुधारित रचनेसह ट्रेन धावतील.

जालन्यात पुन्हा ४० गाड्यांचं वऱ्हाड; आता कोणाची निघणार वरात? व्यापारी वर्गाला धडकी
गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. साप्ताहिक एक्सप्रेस दर शनिवारी २७/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ पर्यंत धावणार.

गाडी क्रमांक १११०० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक एक्सप्रेस २७/०८/२०२२ ते १०/०९/२०२२ पर्यंत दर रविवारी.

गाडी क्रमांक ११०८५ लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 2२७/०८/२०२२ ते ०७/०९/२०२२ पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी धावणार.

गाडी क्रमांक ११०८६ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार आणि गुरुवारी ३०/०८/२०२२ ते ०८/०९/२०२२ पर्यंत धावणार.

वरील गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुत्रप्राप्तीसाठी पुण्यातील विवाहितेला चारचौघात आंघोळ, नराधम मांत्रिक अखेर सापडला

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here