जुन्या मित्राला जेवायला उशिरा का बोलवलं म्हणून ही हत्या केल्याची कबूली अटकेत असलेला आरोपी संतोष परमेश्वर हिप्परगे याने दिली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली पाटी येथे परवा बंद असलेल्या हॉटेलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. रविवारी (दि. २१) रोजी दुपारच्या सुमारास चिखली पाटी (ता. उस्मानाबाद) परिसरात असलेल्या बंद हॉटेलचे शटर उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह मृत अवस्थेत आढळला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांना होता.
धनश्रीने पुन्हा एकदा दिली चहलला धमकी, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय म्हणाली…
सदर महिलेने अनिल सुर्यकांत गोडसे यांच्या गट क्र. ७५ मधील शेतातील रस्त्याच्याकडेची जागा १ महिन्यापूर्वी भाड्याने घेऊन हॉटेल चालू केले होते. त्या शेतकऱ्यानेच बेंबळी (ता. उस्मानाबाद) पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन माहिती दिली होती. आज हॉटेल बंद का आहे? या संशयावरून त्याने पोलिसांना माहिती होती. यानंतर पोलिसांनी हॉटेलचे शटर उघडताच आत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तसेच हॉटेलमध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या व रिकामे बॉक्स देखील आढळून आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेची ओळख पटली होती. मयत महिलेचे नाव कविता व्यंकट देशमुख (३५ वर्षे रा. दत्त नगर मुरुड ता. जि. लातुर ) असून महिलासोबत असलेले संतोष परमेश्वर हिप्परगे रा. येणेगुर ता. उमरगा यांना परवा रात्री पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. काल उस्मानाबाद येथील कोर्टासमोर संतोष परमेश्वर हिप्परगे यांना हजर केले असता कोर्टाने ७ दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.