या प्रकरणात आता तिसरा आरोपी मनवर याला पोलिसांनी अटक केली असून कोठडी दरम्यान मनवर याने धक्कादायक खुलासे केले आहेत. अंकिता जेव्हा अंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिचा ओढणीने गळा दाबून खून करण्यात आला. नंतर मनवर आणि सौरभ या दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले. मात्र तुकडे करण्याआधी मनवरला सोन्याचा मोह आवरला नाही. त्याने अंकिताच्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले होते. चोरलेले दागिने मनवरने घरात लपविले होते. ते दागिने सिडको पोलीसांनी जप्त केले आहेत.
अंकिता-सौरभच्या ‘त्या’ दोन मित्रांच्या चौकशीची शक्यता
अंकिता आणि सौरभचे प्रेम प्रकरण माहिती असलेल्या दोघांचे दोन कॉमन मित्र आहेत. त्यातील एकाने अंकिताच्या फोटोमुळे सौरभकडे संशय व्यक्त केला होता. याच संशयाने सौरभच्या मनात घर केले होते. त्यावरून अंकिताचे इतर कुणासोबत अफेअर असल्याचे त्याला वाटायला लागले होते. आता हे दोन मित्र कोण, याचा शोध पोलीस घेत असून त्यांची चौकशी पोलीस करू शकतात.