नाशिक : गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत असताना आता नाशिकमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लहानपणापासून ज्या नातवाला सांभाळलं त्याने मोठं होऊन आजीच्याच कुरवळणाऱ्या कुशीवर घाव घातल्याने आजीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हरसूल इथे घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.
हा मार इतका भयंकर होता की यामध्ये आजींचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ, पोलीस कर्मचारी एस. सी. जाधव, पी. एम. जाधव अधिक तपास करीत आहे.