Amol mitakari Mahesh Shinde War: राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला “लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के” अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही कळायच्या आतच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली, मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले. रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला “लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के” अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही कळायच्या आतच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली, मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले. रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती. यावेळी रोहित पवारही प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
या सगळ्या प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. महेश शिंदे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की केली, त्यांच्याविरोधात अॅक्शन घ्यावी, त्यांना लगोलग समज देण्यात यावी, अशी मागणी मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.