४ ठिकाणी बॉम्ब ठेवलेत ५ कोटी दे नाहीतर…; ललित हॉटेल धमकी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई – person who threatened to blow up mumbai lalit hotel is suspected from gujarat
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ५ कोटी द्या नाहीतर चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत, अशी धमकी काल देण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी यामध्ये एका आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वलसाड इथून सहार पोलिसांनी आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. आरोपींनी पहिल्या कॉलमध्ये ५ कोटी आणि नंतर तडजोड करून ३ कोटींची मागणी केली होती. यासाठी त्याने हॉटेलमध्ये ४ बॉम्ब लावले असल्याचं धमकावलं. मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक सहार पोलिसांनी आरोपीच्या शोधात गुजरात गाठले आणि त्याला वलसाड येथून अटक केली. यानंतर आता पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबईला दहशतवादी हल्ला करत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता या धमकीच्या फोनने मुंबई अलर्टवर गेली आहे. मुंबईतील ललित होटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी काल देण्यात आली होती. सोमवार संध्याकाळी फोन करून ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एका अज्ञाताने ललित हॉटेलमध्ये फोन करून पैशांची खंडणी मागितली. यामध्ये त्याने तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली आहे. हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत असं आरोपीने सांगितलं. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आता एकाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आता पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.