मुंबई : महाराष्ट्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व धुमश्चक्री पाहायला मिळाली. आजपर्यंतच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करायचे. सरकारविरोधातील रोष आणि आपल्या मागण्या घोषणाबाजीच्या रुपाने मांडून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणायचे. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच विरोधकांना घेरण्याचा प्लॅन आखला. सत्ताधारी आणि विरोधक एकाचवेळी घोषणाबाजी करु लागले. याचदरम्यान मोठा गोंधळ उडालेला असताना काही आमदारांमध्ये बाचाबाची झाली. अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांची लढाई तर गुद्द्यांपर्यंत जाऊन पोहोचली. या साऱ्या प्रकारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली तसेच शिंदे गटाच्या जमखेवर मीठ चोळले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु असून आज कामकाजाचा पाचवा दिवस आहे. आम्ही विरोधी पक्षातील बहुतांश आमदार दररोज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करतो. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हे देखवलं नाही. शेवटी लोकशाहीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करायचं असतं आणि विरोधकांनी जनतेच्या वेगवेगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवायचा असतो. आपण बघाल तर देशातील सर्व राज्यामंध्ये असंच चालतं, पण राज्यातील सत्ताधाऱ्यांना आमची घोषणाबाजी, आम्ही केलेले आरोप खटकले. ते जाणीवपूर्वक आक्रमक झाले. खोक्यांवरुन केलेली घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी धक्काबुक्की केली, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या जमखेवर मीठ चोळलं.

आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांचे एकमेकांना गुद्दे, सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडले
विरोधी पक्षाचे आमदार दररोज सकाळी हसतखेळत घोषणाबाजी करत होते. पण साताऱ्याच्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मिटकरींना शिवीगाळ केली. दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान पत्रकारांनाही धक्काबुक्की झाली. जे काही झालं ते बरोबर नाही. शेवटी घोषणाबाजीचा अधिकार हा सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनीही आहे. बाकी काहीही असलं तरी खोक्यांवरुन केलेली घोषणाबाजी विरोधकांच्या जिव्हारी लागली म्हणूनच त्यांनी धक्काबुक्की केली, असं म्हणत राज्यातील सरकार कोणत्या कारणातून पाडलं, ते त्यांनी सांगावं असा सवालही अजितदादांनी विचारला.

धर्म परिवर्तनाचा मुद्दा नितेश राणेंनी सभागृहात मांडला, सनसनाटी दावे करत सभागृहाचं लक्ष वेधलं
विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधकांमध्ये राडा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबणारी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here