देवीने अभिषेकादरम्यान मिटले डोळे…
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर होत आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ तेलंगणाचा आहे. माँ भद्रकाली धाम इथं मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीला हळदीचा अभिषेक केला जातो. याच अभिषेकादरम्यान जेव्हा देवी आईला अभिषेक होतो तेव्हा ती डोळे बंद करते. हे दृश्य खरोखरच थक्क करणारे आहे. हळदीच्या अभिषेकामुळे तसं दिसत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. पण हीच भोळ्या भक्तांची श्रद्धा आहे.
तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे कसे शक्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. काही लोकांच्या मते ही मूर्ती अशा प्रकारे बांधण्यात आली आहे की, त्यावर हळद टाकताच मूर्तीचे डोळे बंद झाल्यासारखे दिसू लागतात. अशी असंख्य मंदिरे आहेत जिथे असे चमत्कार पाहायला मिळतात. त्यामागचे वास्तव काय आहे, हे माहीत नाही, पण लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे.
महाराष्ट्रात प्राचीन तलावाच्या खोदकामात सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग, पाहा PHOTOS