इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इंदूरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुणानं आधी त्याच्या कुटुंबाला विष देऊन संपवलं. त्यानंतर स्वत: गळफास घेतला. अमित यादव असं तरुणाचं नाव आहे. अमितनं आधी पत्नी टीना यादव आणि तीन वर्षांची मुलगी, दीड वर्षांच्या मुलाला विष देऊन संपवलं. त्यानंतर त्यानं गळफाश घेत स्वत:ला संपवलं. चार जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

घटनेची माहिती पोलीस अमित यादव यांच्या घरी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात कर्जामुळे त्रस्त असल्याचा उल्लेख आहे. कर्जाला कंटाळलेल्या अमित यादवनं त्याची पत्नी आणि मुलांना विष देऊन संपवलं. त्यानंतर त्यानं गळफास घेतला.
जेव्हा पाहिजे तेव्हा दंगल घडवू शकतो! गणेशोत्सवावरून भाजप आमदाराची पोलिसांना थेट धमकी
मध्य प्रदेशच्या सागरमध्ये वास्तव्यास असलेल्या अमित यादव गेल्या काही दिवसांपासून कर्जामुळे त्रस्त होता. मंगळवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी त्याला फोन केले. मात्र अमित यांनी फोन घेतले नाहीत. त्यामुळे अमित यांच्या कुटुंबियांनी याची माहिती भगीरथपुरा इथे राहणाऱ्या त्याच्या सासरच्या मंडळींना दिली. त्यानंतर अमित यांची सासू आणि त्यांचे कुटुंबीय अमित यांच्या घरी पोहोचले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी याची माहिती बाणगंगा पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना अमित यांचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांची पत्नी आणि मुलं बेडवर पडलेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांची नाडी तपासून पाहिल्यावर समजलं. अमित एका टॉवर कंपनीत तंत्रज्ञानाशी संबंधित सेटअपचं काम करायचे.
बापमाणूस! गळ्यात लेक, हाताशी पोरगा! झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर ही वेळ का आली?
अमित यांचं सासर जवळच आहे. त्यांचं कुटुंब जेवायला तिथेच जायचं. स्वत:च्या घरी ते केवळ झोपण्यासाठी यायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एक दिवस आधीच अमित उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. त्यात कर्जाचा उल्लेख आहे. अमित यादव यांनी अनेक कंपन्यांमधून कर्ज घेतलं होतं. त्याची परतफेड करण्यात त्यांना अडचणी येत होत्या. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here