हे वाचा-आकस्मिक मृत्यू की घातपात? ‘सोनाली यांच्या चेहऱ्यावर होती सूज आणि स्ट्रेच मार्क्स
शरद यांंनी नुकत्याच केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मोना आंबेगावकर नावाच्या एका ट्विटर युजरने केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला. या ट्वीटमध्ये संबंधित युजरने आक्षेपार्ह भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली आहे. मोना या युजरचे ट्वीट रीट्विट करणाऱ्या सुजाता आनंदन नावाच्या युजरने देखील सावरकरांवर आक्षेपार्ह कमेंट केली आहे. या दोन्ही ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत शरद यांनी एक सवालही विचारला आहे.
शरद यांनी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिचा उल्लेख करत एक सवाल उपस्थित केलाय. ते म्हणतात की, ‘कोणताही पुरावा नसताना सावरकरांची बदनामी करणाऱ्या ह्या मोनाचा तीव्र शब्दात निषेध. केतकी सारखं हिला तुरूंगात टाकणार का?’ शरद यांच्या पोस्टवर आतापर्यंत शेकडो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. काहींनी मोना आंबेगावकरवर तीव्र भाषेत टीका केली आहे तर काहींनी शरद पोंक्षे यांना गांधीजींवर झालेल्या टीकेचे आठवण करून दिली आहे. शरद पोंक्षे यांच्या पोस्टचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे.

केतकी चितळेचा उल्लेख
शरद यांनी ही टीका करताना अभिनेत्री केतकी चितळेचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेला एक फेसबुक पोस्ट महागात पडली होती. तिने शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर पोस्ट केल्याने अभिनेत्रीविरोधात महाराष्ट्रभरातून २२ एफआयआर दाखल झाल्या आहेत.
हे वाचा-‘ब्रेस्टवर मारलं, माझा विनयभंग होत होता…’ केतकी चितळेने सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं
केतकीला तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. दरम्यानकेतकीविरोधात राज्यभरात दाखल झालेले सर्व FIR आता ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचा मुंबई हायकोर्टाने आदेश दिला आहे. केतकी ४१ दिवस जेलमध्ये होती.