Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 24, 2022, 3:10 PM
Education Sector : आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांविषयी एक वेगळी गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षकाची बदली होती. तेव्हा विद्यार्थ्यांचे हृदय भरून येते. मागीस साडे तीन वर्षांपासून मुदगल येथे कार्यरत शिक्षकाची बदली झाली.

हायलाइट्स:
- आवडत्या शिक्षकाची बदली
- निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर
- परभणीतील पाथरी येथील प्रसंग
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील जिल्हा परिषदेचे शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दिलीप माने हे साडे तीन वर्षांपूर्वी शाळेवर रुजू झाले होते. त्यांनी काही दिवसातच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. याच दरम्यान त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला. मात्र, विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर आपले आवडते माने मास्तर यांची बदली गंगाखेड तालुक्यातील कासरवाडी येथे झाली असल्याची माहिती त्यांना मिळाली.
यानंतर शाळेमध्ये शिक्षक दिलीप माने यांना निरोप समारंभ देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. विद्यार्थी रडत असल्याचे पाहून शिक्षक दिलीप माने देखील गहिवरले होते. संपूर्ण गावाने शिक्षक दिलीप माने यांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network