Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 24, 2022, 3:59 PM

Ashram School : इगतपुरी येथील आश्रम शाळेत विषबाधा झाल्याने दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

 

nashik igatpuri news
मोठी बातमी! नाशकात विषबाधा झाल्याने दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू, चार जण गंभीर

हायलाइट्स:

  • आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा
  • दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूो
  • नाशकातील इगतपुरी येथील धक्कादायक प्रकार
नाशिक: नाशिकमधील इगतपुरी येथील मंतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत उलट्याहून दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांचा आहे. तर इतर चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काल मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण केल्यावर आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

एसी लोकलमुळे ‘वातावरण गरम’, रेल्वेच्या भूमिकेने सामान्यांचे हाल, आता आव्हाडांची मोठी घोषणा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here