दुबई : आशिया चषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारचीय संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. काही दिवस भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. पण आता रोहित शर्मालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना करोना झाल्याचे समोर आले होते आणि त्यामुळेच त्यांना भारतीय संघाबरोबर युएईला जाता आले नव्हते. त्यामुळे आता भारतीय संघाचे काय होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण बीसीसीआयने या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे आणि याबाबत त्यांनी मोठा निर्णयही घेतला आहे. या निर्णयानुसार व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या आशिया कपसाठी दुबईत असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात सामील झाले आहेत. झिम्बाब्वेमध्ये नुकत्याच संपलेल्या भारताच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत प्रशिक्षक म्हणून लक्ष्मण यांनी काम पाहिले होते. पण भारतीय माजी फलंदाज हरारेहून दुबईतच थांबल्याची माहिती क्रिकबझला या वृत्तसंस्थेथेने दिली आहे. झिम्बाब्वे मालिकेत खेळलेला आणि आशिया कप संघाचा भाग नसलेला उर्वरित संघ भारतात परतला आहे.

लक्ष्मण हे भारताच्या संघाबरोबर काही काळ आहेत. त्यामुळे खेळाडूंबरोबर त्यांचा चांगला समन्वय आहे. त्यामुळे लक्ष्मण हा बीसीसीआयपुढे प्रशिक्षकपदासाठी पहिला पर्याय असून शकतो, असे म्हटले जात होते. त्यामुळे आता लक्ष्मण यांना भारतीय संघाबरोबर पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे करोना झाल्यावर द्रविड यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पण द्रविड हे आशिया चषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी युएईमध्ये दाखल होऊ शकतात. कारण आता द्रविड यांची करोना चाचणी गुरुवारी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल नेमका काय येतो, यावर सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. जर द्रविड यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला तर त्यांना आशिया चषकासाठी पाठवण्यात येणार नाही. पण जर गहा अहवाल निगेटीव्ह आला तर नक्कीच द्रविड यांना शुक्रवारी युएईला पोहोचता येऊ शकते. आशिया चषक स्पर्धेचा पहिला सामना हा शनिवारी होणार आहे, तर भारताचा पहिला सामना हा रविवारी होणार आहे. त्यामुळे जर द्रविड हे शुक्रवारी युएईमध्ये दाखल झाले तर नक्कीच त्यांना संघाबरोबर राहता येईल आणि मार्गदर्शन करता येईल. त्यामुळे बीसीसीआय आता काय निर्णय घेतेल, याकडजे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here