एका तरुणाची प्रेयसी शाळेतील परीक्षेत नापास झाली. त्यामुळे प्रियकर संतापला. त्यानं रागाच्या भरात तिची शाळाच पेटवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली.

 

school fire
शाळेला आग
एका तरुणाची प्रेयसी शाळेतील परीक्षेत नापास झाली. त्यामुळे प्रियकर संतापला. त्यानं रागाच्या भरात तिची शाळाच पेटवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणीही जखमी झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली. त्यानं चौकशीत दिलेल्या माहितीनं पोलिसांना धक्का बसला.

इजिप्तच्या मेनोऊफिया प्रांतातील एक शाळा २१ वर्षांच्या तरुणानं पेटवली. या परीक्षेत त्याची प्रेयसी शिकत होती. दोघांचा साखरपुडा झाला होता. होणारी पत्नी शाळेतील परीक्षेत नापास झाली. प्रेयसी अनुत्तीर्ण झाल्यानं लग्न पुढे ढकललं जाईल. तिला पुन्हा वर्षभर अभ्यास करावा लागेल, या विचारातून तरुणानं प्रेयसीची शाळाच पेटवून दिली.
मंदिरातून घरी आले, दार बंद केले; पोलिसांनी दरवाजा तोडताच नातेवाईक हादरले, परिसरात खळबळ
आगीमध्ये शाळेतील कंट्रोल रुम जळून खाक झाली. शाळेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून गेली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं काही वेळातच ही आग नियंत्रणात आली. शाळेला आग लावल्यानंतर आरोपी तरुण पळून गेला आणि स्वत:च्या गावात जाऊन लपला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरुणाला अटक केली.
जेव्हा पाहिजे तेव्हा दंगल घडवू शकतो! गणेशोत्सवावरून भाजप आमदाराची पोलिसांना थेट धमकी
पोलीस चौकशीत तरुणानं गुन्ह्याची कबुली दिली. त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सध्या आरोपी तरुण पोलीस कोठडीत आहे. सध्या ही घटना इजिप्तमधील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here