गेल्या बुधवारी माझी आई वारली. त्यानंतर जवळपास चार तासांनी आम्ही तिच्या पार्थिवासोबत फोटो काढला. आम्ही तिच्या जीवनाबद्दल आनंद व्यक्त केला, असं मरियम्मा यांचे पुत्र फादर जॉर्ज यांनी सांगितलं. ते धर्मशास्त्राचे प्राध्यापक आहेत. आम्हाला तिच्या निधनानं दु:ख झालं. आमच्या आयुष्यावर तिचा खूप मोठा प्रभाव आहे. तो प्रभाव कसा साजरा करावा असा प्रश्न आम्हाला पडला. आम्ही सगळ्यांनी तिच्यासोबतचे अविस्मरणीय, आनंदाचे क्षण आठवले. ते क्षण, त्या घटना, ते प्रसंग आठवून आमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. देवानं आमच्या आईला इतकं छान आयुष्य दिलं, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानले. ते केल्यानंतर आम्ही निश्चिंत झालो, असं जॉर्ज यांनी म्हटलं.
Home Maharashtra kerala family, अंत्यसंस्कारावेळी सगळेच हसले; पार्थिवासोबतचा फोटो व्हायरल, कारण वाचून कौतुक वाटेल...
kerala family, अंत्यसंस्कारावेळी सगळेच हसले; पार्थिवासोबतचा फोटो व्हायरल, कारण वाचून कौतुक वाटेल – smiling faces and selfies of four generations at the funeral in kerala
कोट्टायम: घरातील व्यक्ती गमावल्यानंतर कुटुंबावर, नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र केरळमधील एका कुटुंबात वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. या कुटुंबाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या स्वभावावर प्रश्न उपस्थित केलं आहे. तुम्ही दु:खाच्या क्षणी अशाप्रकारे हसू शकत नाही, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.