ठाणे : ठाण्यातील आझाद नगरमध्ये एका व्यक्तीने चक्क पोलीस आयुक्तांची खोटी सही करून सुरक्षा रखक कंपनीचे प्रमाणपत्र बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांच्या हाती लागताच ठाण्यातील कापुरबावडी पोलिसांकडून या अवलियाला अटक केली असून पुढील कारवाई कापुरबावडी पोलीस करत आहेत. (police arrested the person who forged the signature of police commissioner)

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या एका आवलियाने सुरक्षा रक्षक कंपनीची स्थापना केली. मात्र ही कंपनी सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पोलिसांच्या प्रमाणपत्रावर या आवलियाने स्वतःच चक्क ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची खोटी सही केली आहे. २१ ऑगस्ट रोजी कापुरबावडी पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीसकर्मी यांना गुप्त माहितीदारांच्या मदतीने ही माहिती मिळाली. या प्रकारणाची माहिती ठाण्यातील कापुरबावडी पोलिसांना मिळाल्यानंतर कापुरबावडी पोलिसांनी या अवलियाला पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची खोटी सही केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तुम्ही हे कासव कधी पाहिले आहे का?; ठाणेकरांनी वाचवला या दुर्मिळ कासवाचा जीव
या अवलियाने स्थापित केलेल्या सुरक्षा रक्षक कंपनीसाठी २७ फेब्रुवारी २०२२ ते २६ फेब्रुवारी २०२७ पर्यंतच्या काळाचे हे खोटे प्रमाणपत्र पोलीस आयुक्तांच्या खोट्या सहीने बनवले आहे. शिवम पांडे असे या अवलियाचे नाव असून त्याच्याविरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्याकडील खोटे प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी या अवलियाच्या विरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.

घरात सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघे गंभीर जखमी, गॅस गळतीमुळे घटना घडल्याचा अंदाज
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रमाणपत्र बनविण्यापर्यंत मजल मारत खोट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी शिंवम पांडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या शिवम पांडे याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का? अशा प्रकारे खोट्या सह्या करून किती प्रमाणपत्र बनवले आहेत? यात त्याचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोध ठाणे कापुरबावडी पोलीस करत आहेत.

प्रवाशांचा AC लोकलविरोधातील संताप यामुळे वाढतोय; आज केले आंदोलन, म्हणाले, बंद करा एसी लोकल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here