माणसानं कधीच डायनासॉर पाहिलेले नाहीत. मात्र त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आतापर्यंत अनेकदा सापडल्या आहेत. आता अमेरिकेच्या टेक्सासमधल्या डायनासॉर व्हॅली स्टेट पार्कमध्ये असलेल्या नदीपात्रात डायनासोरच्या अस्तित्वाचं पुरावे आढळले आहेत.

नदीपात्रातील पाणी आटल्यानं डायनासॉरचा ट्रॅक स्पष्टपणे दिसू लागल्याचं टेक्सास पार्क अँड वाईल्डलाईफ डिपार्टमेंटच्या अधिकारी स्टेफनी सलीनाज ग्रेसिया यांनी सांगितलं. उन्हाळ्यात अधिक दुष्काळ पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नदी आटली. त्यामुळे डायनासॉर मार्गक्रमण करत असलेली अनेक ठिकाणं आढळून आली आहेत. आधी हे भाग नदीच्या पाण्याखाली होते, अशी माहिती स्टेफनी यांनी दिली.
टेक्सासमधील पार्कमध्ये आढळून आलेल्या पाऊलखुणा डायनासॉरच्या एक्रोकँथॉसॉरस प्रजातीच्या आहेत. पूर्णपणे वाढ झालेल्या एक्रोकँथॉसॉरसचं वजन ७ टन असायचं. त्याची लांबी १५ फूट असायची. सॉरोपोसिडॉन प्रजातीच्या डायनासॉरच्या पाऊलखुणादेखील आढळून आल्या आहेत. सॉरोपोसिडॉनचं वजन ४४ टन असायचं. त्याची लांबी तब्बल ६० फूट असायची.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.